Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : उपचारासाठी नेत असताना 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील जालगाव ब्राम्हणवाडी येथील ३० वर्षीय तरुणाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सागर दयाळ डाखोरे (वय ३०, रा. जालगाव ब्राम्हणवाडी, महालक्ष्मी मंदिरासमोर, ता. दापोली) यांना ६ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास घरी असताना अचानक छातीत दुखू लागले व त्यांना मोठ्या प्रमाणात धाप लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने भागवत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.

तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, प्रवासादरम्यान त्यांच्या हालचाली होत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.


या घटनेची नोंद बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ५०/२०२६ म्हणून करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *