Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : तालुक्यातील सुकीवली येथे 20 वर्षीय युवकाची आत्महत्या, अकस्मात मृत्यूची नोंद

banner 468x60

खेड तालुक्यातील सुकीवली बौद्धवाडी येथे २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (३१ जुलै) उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व परशराम राबते (वय २०, रा. सुकीवली बौद्धवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) याने ३१ जुलै रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ७.०० या कालावधीत राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.


या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६७/२०२६ अशी नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार युवकाने कोणत्यातरी कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, युवकाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सुकीवली परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *