रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडी येथे असणाऱ्या डोंगराला सध्या तडे गेले असून पूर्ण वाडी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. गेल्या तीन वर्षापासून येथील डोंगराला तडे गेले असून पावसाळ्यापूर्वी प्रशासन त्यांना स्थलांतरितेच्या नोटीस देते. परंतु त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत आहे. हल्लीच घडलेली इर्शालवाडी घटना घडलेली अशी घटना येथे होण्याची प्रशासन वाट बघत आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. कोकणात सध्या पावसाला जोर असून अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील काही घरांना तडे देखील गेले आहेत. स्मशानभूमीची जागा 3 फूट खचली आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात. असे असताना या हा हाडामासाच्या लोकांचा प्रशासनाने विचार करून येथील ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
रत्नागिरी : हरचेरी बौद्धवाडी येथील डोंगराला तडे; ग्रामस्थांचा प्रशासनाला सवाल
Recommendation for You

मंडणगड शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न आता कायमस्वरूपी सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले…

राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक आणि साठा करणाऱ्या एका तरुणाला…

देवरुख-रत्नागिरी मार्गावरील आंबव परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुळसणी गावातील…

चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५६…









