Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दापोली : पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा रागातून पीडित विवाहितेला घरात घुसून बेदम मारहाण

banner 468x60

शेजारीच असणाऱ्या महिलेचे पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून चौघांनी पीडित विवाहित महिला व तिच्या आईला तिच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. ही घटना दापोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात घडली. मात्र, या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या महिलेने पोलिस स्थानकात फिर्याद दिली नसल्याची चर्चा सुरू आहे. या गावातील एका गाव पुढाऱ्याचे शेजारीच असणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे त्या पुढाऱ्याच्या बायकोला कळले. या रागातून त्या महिलेने पीडित महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या आईला मारहाण केली. यावेळी त्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि तिचा मोबाइल हिसकावून घेतल्याची चर्चा आहे. काही दिवसांनी पुन्हा त्या महिलेने धमकी दिल्याने घाबरलेल्या महिलेने पोलिस स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेला काही दिवस झाल्याने पोलिसांनीही हात वर केल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *