Breaking News
गुहागर : अनंत तानकरांची मॅरेथॉनमध्ये दमदार कामगिरी, 21 किमी शर्यतीत पटकावला द्वितीय क्रमांक लांज्यात 16 वर्षीय मुलगा बेपत्ता, पोलिसांत नोंद रत्नागिरी : गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 1.92 लाखांचा मुद्देमाल जप्त, 40 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त राजापूर : राजापुरात रस्त्यावर मासेविक्री, सहा महिलांवर नगरपरिषदेची कारवाई, मच्छीची खवले व सांडपाणी रस्त्यावर टाकून दुर्गंधी पसरवल्याचा आरोप, सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल चिपळूण : चिपळूण बाजारपेठेत फटाके विक्रीला बंदी, नगरपरिषदेचा मोठा निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणार; सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाची खबरदारी

दापोली : एसटी आणि रिक्षामध्ये भीषण अपघात

banner 468x60

दापोली – एसटी बस आणि ॲपेरिक्षाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला.

सुरेश भिकु पाटील असे मृत चालकाचे नाव आहे.हा अपघात उन्हवरे पोलीस बिटातील उर्फीनजीक आज दुपारी दीडच्या सुमारास झाला

आज दुपारी उर्फीकडून फणसूकडे सुरेश पाटील रिक्षा घेऊन निघाले होते.

तर दापोलीकडून पांगारीकडे बस निघाली होती. यावेळी बसची आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली.

अपघातानंतर कोंढे गावातील आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा दापोली पोलिसांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *