Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

चिपळुण : डम्परच्या धडकेत महिला गंभीर जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर डेन्जर झोन बनलेल्या पॉवर हाऊस येथील चौकात सातत्याने अपघात घडत आहेत. या ठिकाणी अनेकांचे जीवही गेले आहेत.

बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एका डम्परची मोटारसायकलला धडक बसून महिला गंभीर जखमी झाली आहे. करूणा काशिराम पालांडे असे या महिलेचे नाव आहे.

पोलिस ठाण्याकडून येणारा डम्पर मुंबईच्या दिशेने वळण घेत असताना समोरून मोटारसायकलने येणाऱ्या करूणा पालांडे यांची मोटारसायकल डम्परच्या समोरील भागास मधोमध आली व त्यामध्ये त्या पडल्या.

सुदैवाने त्या डम्परच्या दोन चाकांच्या मध्ये गेल्याने वाचल्या. मात्र, यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले व संबंधित महिलेला रुग्णालयात हलविले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *