Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : मुरुड येथे दुर्मिळ विशाल पतंगाचे दर्शन, पर्यटकांमध्ये उत्सुकता

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील विरंगुळा बीच रिसॉर्ट परिसरात दुर्मिळ विशाल पतंगाचे (Giant Moth) दर्शन झाल्याने पर्यटक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी दिसलेल्या या आकर्षक पतंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

banner 728x90

रिसॉर्ट परिसरातील झाडांवर हा विशाल पतंग आढळून आला. त्याच्या मोठ्या पंखांचा आकार, वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती आणि निसर्गरम्य रूपामुळे पर्यटकांनी त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ टिपण्याची एकच गर्दी केली.

निसर्ग अभ्यासकांच्या मते, पावसाळ्याच्या सुरुवातीला आर्द्रता आणि अनुकूल हवामानामुळे अशा दुर्मिळ पतंगांचे दर्शन घडण्याची शक्यता वाढते. हे पतंग पर्यावरणातील जैवविविधतेचे महत्त्वाचे घटक मानले जातात आणि त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरातील नैसर्गिक अधिवास समृद्ध असल्याचे संकेत मिळतात.

मुरुड समुद्रकिनारा आणि त्याच्या परिसरातील हिरवाईमुळे विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि कीटकांचे अधिवास येथे आढळतात. त्यामुळे अशा दुर्मिळ जीवांचे दर्शन पर्यटकांसाठी एक वेगळाच निसर्गानुभव ठरत आहे.

रिसॉर्ट प्रशासनाने पर्यटकांना या दुर्मिळ पतंगाला कोणतीही हानी न पोहोचवता सुरक्षित अंतरावरून निरीक्षण करण्याचे आणि परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *