Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : मध्यवर्ती हायटेक बस स्थानकाचे काम एप्रिल–मे अखेरपर्यंत पूर्ण होणार ?

Screenshot

banner 468x60

चिपळूण शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या हायटेक बस स्थानकाच्या कामाला वेग आला असून हे काम एप्रिल–मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती ठेकेदार तेजस शिंदे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

https://www.facebook.com/share/r/17K2eJwho6/?mibextid=wwXIfr

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान ठेकेदार तेजस शिंदे यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे मूळ अंदाजपत्रक २०१६ साली तयार करण्यात आले होते. मात्र, कोरोना काळात शासनाकडून निधीत कपात झाल्यामुळे सुरुवातीला ५.८५ कोटी रुपये मंजूर असलेले हे काम आता २.८७ कोटी रुपयांत पूर्ण केले जात आहे. निधी कमी असतानाही कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन राखत सध्या काम वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पाहणीदरम्यान काही बाबींवर नाराजी व्यक्त केली.

विशेषतः बस स्थानकातील शौचालये अंतर्गत भागात घेण्यात आल्याबाबत त्यांनी असमाधान व्यक्त केले. प्रवाशांच्या सोयीसुविधांचा विचार करून या बाबींचा पुनर्विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच १५ जानेवारीनंतर परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी या ठिकाणी घेऊन येण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी बस स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री महोदयांकडे करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान नगराध्यक्षांनी कामाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रवाशांच्या सुरक्षितता, स्वच्छता आणि सोयीसुविधांना प्राधान्य देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच शासन आणि चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


या पाहणीप्रसंगी आगर प्रमुख दीपक चव्हाण, स्वप्निल भोसले, स्वरूप माने, गौरव उदक, नगरसेवक निहार कोवळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हायटेक बस स्थानक पूर्ण झाल्यानंतर चिपळूण शहरातील प्रवाशांना अधिक सुविधा आणि आधुनिक सेवा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *