संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचा सापळा, ठेकेदाराच्या बेफिकिरीमुळे भीषण अपघात, प्रवाशांचा संताप उफाळला

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या आणि निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामामुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी रात्री पारेख पेट्रोल पंपाजवळ एका अवजड वाहनाचा थरारक अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी केवळ दीड ते दोन फुटांच्या फरकामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्पष्ट झाले आहे.

महामार्गाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्यामुळे त्या मार्गावरून सध्या दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, पूर्ण झालेला मुख्य रस्ता आणि शेजारील कच्चा रस्ता यामध्ये तब्बल दीड ते दोन फुटांची उंचीची धोकादायक दरी उघडी ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे बॅरेकेट्स, सूचना फलक किंवा रिफ्लेक्टर लाइट्स नसल्याने हा भाग रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक बनला आहे.

अपघातग्रस्त वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे त्याचा अंदाज चुकला. दुसऱ्या वाहनाला साईड देताना त्याची गाडी मुख्य रस्त्यावरून घसरून खाली उतरली. रस्त्याची कडा नेमकी कुठे संपते, याचा अंदाज न आल्याने वाहनाचा अर्धा भाग हवेत लटकत राहिला, तर उर्वरित भाग कच्च्या रस्त्यावर आदळला. काही क्षणांतच मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या घटनेनंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवासी अक्षरशः अडकून पडले होते. दोन ते अडीच तास सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

घटनेनंतर ठेकेदार कंपनीचा एकही प्रतिनिधी मदतीसाठी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली. अखेर स्थानिक नागरिक, अडकलेले प्रवासी आणि पोलिसांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने वाहन बाजूला केले. सुमारे मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, आरवली ते कांटे या पट्ट्यात यापूर्वीही अशा अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

वारंवार अपघात होऊनही ठेकेदार कंपनीकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हा प्रकार केवळ अपघात नसून ठेकेदाराच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराचा परिणाम असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवासी अक्षरशः अडकून पडले होते. दोन ते अडीच तास सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

घटनेनंतर ठेकेदार कंपनीचा एकही प्रतिनिधी मदतीसाठी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली. अखेर स्थानिक नागरिक, अडकलेले प्रवासी आणि पोलिसांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने वाहन बाजूला केले. सुमारे मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान, आरवली ते कांटे या पट्ट्यात यापूर्वीही अशा अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. वारंवार अपघात होऊनही ठेकेदार कंपनीकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हा प्रकार केवळ अपघात नसून ठेकेदाराच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराचा परिणाम असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *