Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरीत : ब्राऊन हेरॉईन सापडले, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

रत्नागिरीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना पथकाने ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या 405 पुड्या घेऊन जाणाऱ्या तिघांना पकडले.

त्यांच्याकडील ब्राऊन हेरॉईन आणि अन्य साहित्य असा 1 लाख 45 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकता नगर परिसरात गस्त घालताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाला तीन जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

आरोपी रूउफ इक्बाल डोंगरकर (वय 35,रा.कर्ला), नझीर अहमद मोहम्मद वस्ता (वय 38, रा.राजिवडा) आणि राहील अजीज सुवर्णदुर्गकर (वय 29, रा.राजिवडा) या तिघांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे ब्राऊन हेरॉईनच्या 405 पुड्या सापडल्या.

त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,शांताराम झोरे,विजय आंबेकर,दिवराज पाटील आणि विवेक रसाळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *