Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : मेंटल हॉस्पिटलमध्ये मतिमंद मुलाला अमानुष मारहाण, वॉर्ड बॉय आणि नर्सने केली मारहाण कुटुंबीयांचा आरोप

banner 468x60

रत्नागिरी मनोरुग्णालयात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मतिमंद मुलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. नुसती मारहाण नाही तर चक्क तोंडाचा दोन ठिकाणी जबडा फाटण्यापर्यंत जबर मारहाण करण्यात आली आहे.

त्याच्याकडे पाहिल्यानंतर जबडा खालच्या बाजूला सरकल्याचे दिसत आहे. हा मुलगा अक्षरशः रडत आहे. तो मतिमंद असला तरी त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते हे पाहून त्याला खूपच वेदना होत असाव्यात असे दिसून येत आहे. एवढ्या अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याने त्याची आई संतप्त झाली आहे.

तिने रत्नागिरी शहर पोलिसांना निवेदन दिले आहे. या मध्ये रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि नर्स वर त्यांनी आरोप केले आहेत. गंभीर जखमी मुलाला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र येथील डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवले आहे. या प्रकारानंतर मुलाचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी मनोरुग्णालयाबाबत संशय व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण झाली आहे तर ती हाताने नसावी, तर कोणत्यातरी वस्तूने झाली असावी असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.


रुग्णाची सिटीस्कॅन केली असता जबड्याचे हाड 2 ठिकाणी तुटलेले दिसून येते.या घटनेत संबंधित रुग्णाच्या जबड्याला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली असून, रुग्णाच्या आईने पोलिसांकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मन्नान मुनाफ फणसोपकर (२५), हा मतिमंद तरुण असून, २५ मे रोजी उपचारासाठी रत्नागिरीच्या मानसिक आरोग्य रुग्णालयात (मेंटल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले होते.

मात्र, दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मन्नान याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती त्यांना मिळाली.


सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मन्नानच्या जबड्याला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे समजले. तेथील डॉक्टरांनी रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने येथे उपचार शक्य नसल्याचे सांगितले व तत्काळ डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

विशेष म्हणजे, मेंटल हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णाच्या नातेवाइकांना ना तर जखमी झाल्याची, ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मन्नानला मेंटल हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय व परिचारिका घेऊन गेले होते. डॉक्टरांनी रुग्णाच्या आई आणि मन्नान यांना अॅम्बुलन्समध्ये जबरदस्तीने बसवून डेरवण येथे पाठवले.

या घटनेमुळे रुग्णाच्या आई शरीफा मुनाफ फणसोपकर यांनी रत्नागिरी पोलीस निरीक्षकांना लेखी अर्जाद्वारे मागणी केली आहे की, मन्नानवर झालेल्या अमानुष मारहाणीची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी.

रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत

संतप्त झालेल्या आईने रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मागितले असता इथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असे उत्तर देण्यात आले.

या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मानसिक रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मनोरुग्ण अधीक्षक संघमित्रा फुले यांची धक्कादायक प्रतिक्रिया
एका मनोरुग्णाने मारहाण केली किंवा हा मुलगा बेड वरून पडल्यामुळे जबडा फाटला असावा अशी अजब प्रतिक्रिया दिली आहे.

मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बेड वरून पडल्यानंतर जबडा कसा तुटू शकतो. बेडची उंची जेमतेम 2 फूट असते. मग यावरून पडुन त्याचा जबडा कसा फाटू शकतो. असे अनेक प्रश्न आहेत. एकंदरीत या अमानुष मारहाणीत चौकशी अंती सारा प्रकार समोर येईल आणि रुग्णालयाच पितळ उघड होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *