Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : प्रेमसंबंधांचा वाद पेटला, बाप-लेकाच्या डोक्यात लादी फोडली!

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी शहरातील राजिवडा पुलाखाली मंगळवारी (दि. २१ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रेमसंबंधाच्या वादातून आरोपींनी बाप-लेकाच्या डोक्यात लादीचा तुकडा घालून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नजीर हसनमियाँ होडेकर (वय ५२, रा. राजिवडा पुलाखाली) हे मासेमारी करून घरी परतले असताना त्यांचा मुलगा अरमान होडेकर याच्यावर आरोपी रमजान नवाज मिरकर (वय २६) मारहाण करत होता. हे पाहून वडील नजीर यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नामुळे परिस्थिती आणखी चिघळली.
यावेळी आरोपी रमजान मिरकर याने नजीर यांना उद्देशून, “तू इथे थांबू नकोस. तुमच्या पत्नीने माझ्या आणि तुमच्या सुनेच्या प्रेमसंबंधांबद्दल बदनामी केली आहे. आता तुलाही ठार मारीन,” अशी उघड धमकी दिली.

त्यानंतर त्याने त्वेषाने हातातील दगडी लादीचा तुकडा नजीर यांच्या डोक्यात घालून त्यांना रक्तबंबाळ केले. याचवेळी रमजानचा वडील, नवाज अलीसाहब मिरकर (वय ४५), याने देखील नजीर यांना हाताने मारहाण केली.


भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणारा मुलगा अरमान देखील यातून सुटला नाही. रमजान मिरकर याने त्याच दगडी लादीने अरमानच्या डोक्यातही प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी दोघा आरोपींनी बाप-लेकाला शिवीगाळ देखील केली. घटनेनंतर जखमी नजीर आणि अरमान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, नजीर होडेकर यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रमजान नवाज मिरकर आणि नवाज अलीसाहब मिरकर यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कायदा २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक ४०८/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *