रत्नागिरी : जिल्ह्यात पुढील 3 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

banner 468x60

भारतीय हवामान विभागाने, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आणि अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्षाने केले आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 02352 – 222233/226248 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *