रत्नागिरी : चंद्रदर्शनानंतर रमजानला उद्यापासून प्रारंभ

banner 468x60

रत्नागिरी : चंद्रदर्शनानंतर रमजानला रविवार, २ मार्चपासून प्रारंभ होत आहे. शहर परिसरात उपवास सोडण्यासाठी फळे, खजूर व शेवया विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत.

रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची प्रार्थना (इबादत) केली जाते. रमजान संपल्यानंतर ‘ईद-उल्-फित्र’ साजरी केली जाते.

चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी रात्रीपासूनच तरावीहच्या नमाजला प्रारंभ होत आहे. रमजानदरम्यान, सहेरी, रोजा (उपवास) इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

रविवारी पहाटे फज्रची नमाज अदा केल्यानंतर पहिल्या रोजाला प्रारंभ होईल. सूर्योदयापूर्वी सहेरी (उपवासाला प्रारंभ), तर सूर्यास्तानंतर रोजा इफ्तारी (उपवास सोडणे) केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *