रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी आरंशा यादव यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला आहे.
निलेश माईंनकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय कामकाजासह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या बदलीनंतर आता पालघर येथे त्यांच्यावर नवीन प्रशासकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आरंशा यादव या २०२३ बॅचच्या IPS अधिकारी असून त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा २०२२ मध्ये देशात २०१ वा क्रमांक मिळवला आहे. मूळच्या हरियाणा राज्यातील यादव यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्सची पदवी घेतली असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
सुरुवातीला त्यांची निवड गुजरात केडरसाठी झाली होती. मात्र विवाहानंतर त्यांचे महाराष्ट्र केडरमध्ये स्थानांतरण झाले. यापूर्वी त्या कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.
रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर यादव यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, महिला व बालकांची सुरक्षा तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण यांना अधिक प्रभावीपणे हाताळले जाण्याची अपेक्षा आहे. तरुण आणि उच्चशिक्षित अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी पोलिसांच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













