Breaking News
चिपळूण : 38 वर्षीय तरुणाचा खोलीत मृतदेह आढळला, दोन दिवसांपासून होता घरातच रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात चिपळूण : रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था करा, शौकतभाई मुकादम यांची मागणी मंडणगडच्या दोन शाळकरी मुलींची भरारी थेट अमेरिकेत! गोठे आणि वेसवीच्या अपेक्षा-मानस करणार अंतराळ संशोधन केंद्राला भेट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सातासमुद्रापार झेप

रत्नागिरी : दावोसमध्ये कोकणासाठी 3 लाख कोटींचे अकरा करार – मंत्री उदय सामंत

banner 468x60

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 37 कोटी 27 हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून 43 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली असून कोकणात 3 लाख कोटींचे 11 करार झाले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत झाली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहे. पहिल्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे करार झाले होते. मागील दोन दिवसात 37 लाख 27 हजार 787 लाख कोटींची करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे 43 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. एका दिवसात 51 करार झाले आहे. यामध्ये एमआयडीसीसोबतच एमएमआरडीए, सिडको यांचाही समावेश आहे. एमएमआरडीएमध्ये 19 तर सिडकोसोबत 6 करार झाला आहे. मागील दोन दिवसात 81 करार झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणासाठी 11 करार झाले असून त्यात 3 लाख 810 कोटींची गुंतवणुकीचे करार झाले आहेत. आयटी, डेटा सेंटर्स, ईव्ही ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिफेन्स, डिजिटल इन्फ्रा सारखे उद्योग असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *