Breaking News
दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश महाड : दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून पडून संगमेश्वरमधील २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, महाडमधील कावळे गावाजवळ दुर्घटना खेड : सात वर्षीय मुलावर लोखंडी रॉडने हल्ला, महिलेचा शोध सुरू, मैदानात खेळण्यासाठी जात असताना मागून येऊन डोक्यावर केला वार

राजापूर : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला लूटणाऱ्या संशयिताचे स्केच तयार

banner 468x60

राजापूर येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन दिवसांपूर्वी महिलेला लुटण्याचा घडलेल्या घटनेप्रकरणी संशयिताचा शोध घेण्याच्यादृष्टीने पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे स्केच तयार केल्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेच्या डोक्यात रॉड घालून तिचे दागिने लुटण्याचा प्रकार महामार्गावर दसऱ्याच्या दिवशी घडला होता. रश्मी प्रभाकर चव्हाण या कोदवली-तरळवाडी येथून सायंकाळी महामार्गावरील कोदवली थांब्यावर उभ्या होत्या. त्यांनी एका मोटारीला हात दाखवला. मोटारचालकाने त्यांना लिफ्ट दिली; मात्र, त्यानंतर त्याने पेडणेकर होम स्टॉपजवळील वळणावर चव्हाण यांच्या डोक्यात रॉड मारून जखमी केले व त्यांच्याकडील रोकड, सोन्याची बुगडी व मोबाईल हिसकावून घेतला तसेच चव्हाण यांना चालत्या गाडीतून रस्त्यावर ढकलून पलायन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *