खेड तालुक्यातील शिव बुद्रुक मोहल्ला येथे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद महम्मद परकार (वय ५६, व्यवसाय शेती, रा. शिव बद्रक मोहल्ला, ता. खेड) यांनी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या मावस भावाचे घर त्यांच्या शेजारीच असून, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.४० वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने या घराला लक्ष्य केले.
चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य साहित्य चोरून नेले.
चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा तपशील :
दोन सोन्याच्या चेन – प्रत्येकी २२ हजार ५०० रुपये, एकूण ४५ हजार रुपये.
तीन सोन्याच्या अंगठ्या – प्रत्येकी ९ हजार रुपये, एकूण २७ हजार रुपये.
सोन्याच्या कानातील तीन जोड पुळ्या – प्रत्येकी ११ हजार २५० रुपये, एकूण ३३ हजार ७५० रुपये.
रोख रक्कम – ५ हजार रुपये.
एचपी कंपनीचा गॅस सिलेंडर – १ हजार ५०० रुपये.
एक्साईड कंपनीच्या तीन इन्व्हर्टर बॅटरी – ३० हजार रुपये.
अॅल्युमिनियम व तांब्याची आठ भांडी – ५ हजार रुपये.
अशा प्रकारे एकूण १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले बहुतांश दागिने आणि साहित्य जुने वापरते असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०७ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून चोरट्याने केलेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान आता खेड पोलिसांसमोर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













