राजापूर येथे मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स महामार्गावरील डिव्हायडरवर आदळल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून, जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. अपघातानंतर परिसरात काही काळ धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी तत्काळ प्रयत्न करण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने प्रवास करणाऱ्या या टेम्पो ट्रॅव्हल्सला नेमका अपघात कशामुळे झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू असून, जखमींची प्रकृती आणि अपघाताबाबतची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













