Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : जमिनीच्या वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी, आणि शिवीगाळ

banner 468x60

राजापूर तालुक्यातील कोंढेतड (तेलीवाडी) येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


फिर्यादी सुप्रिया सुनील कुर्ले (वय ४७), रा. कोंढेतड तेलीवाडी, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या अंगणात घडली. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात गेल्या काही काळापासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहे. या वादाचे पर्यवसान शनिवारी सायंकाळी शिवीगाळ आणि धमकावण्यात झाले. आरोपींनी फिर्यादीला “सकाळीच तुला दांडक्याने आडवा केला असता” असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच “आम्ही तुम्हाला कशावरून शिव्या घातल्या, तुमच्याकडे काय पुरावा आहे?” असे म्हणत अरेरावी केली.



तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी सुभाष कुर्ले आणि लघू कुर्ले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत धमकी दिली की, “कोण आम्हाला अडवतो ते बघतो, जो दिसेल त्याला आडवा करीन, मारीन आणि पुढे जाईन. तुझा सासरा मेला, आता तुला पण पोहोचवतो.” या धमकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


याप्रकरणी सुप्रिया कुर्ले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभांगी सुभाष कुर्ले (५०), दुर्वा दर्शन कुर्ले (३२), सुषमा लघू कुर्ले (४९), सुभाष दशरथ कुर्ले (५३), लघू दशरथ कुर्ले (५२) या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), ३५२, ३५१(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *