Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

संगमेश्वर : अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील अल्पवयीन मुलीची छेडछाड करणार्‍या तालुक्यातील तुळसणी येथील रसिक कासम बोट याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रसिक याला सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रसिक हा 24 वर्षीय तरुण असून पीडित अल्पवयीन मुलीला गेली दीड वर्षे मानसिक त्रास देत होता. या बाबत देवरुख पोलिस ठाण्यामध्ये या घटनेतील अल्पवयीन मुलीनेच त्याच्याविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली.

यानुसार देवरुख पोलिसांनी रसिकला तत्काळ ताब्यात घेतले.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी एकत्र येऊन पीडित मुलीला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *