Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : रस्ते अपघातात जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुमतियाल रतिलाल हरिजन (वय ६५, रा. फरी, ता. बरकोट नवगारा, जि. उत्तरकाशी, राज्य- उत्तराखंड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शनिवार, २४ जानेवारी रोजी पहाटे

कराड-चिपळूण मार्गावरील पिंपळी बुद्रुक येथील ‘न्यू कोयना पॉवर हाऊस’ जवळ एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. रस्त्याने जाणाऱ्यांना हा प्रकार दिसल्यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.
जखमी अवस्थेत असलेल्या धुमतियाल हरिजन यांना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *