पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका 3.5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने 65 वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी मानत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणाची सुनावणी (25 जून ) रोजी पूर्ण झाली होती. त्यावेळी न्यायालयाने निकाल सुनावताना हा आरोपी दोषी असल्याचं म्हटलं होतं. पुण्यातील विशेष न्यायालयाने निकाल दिला आणि त्यात आरोपीने बलात्कार व हत्या केल्याचे म्हटलं.
आरोपीने याआधी 53 वर्षांचा असताना देखील आपल्या कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला आहे. तसेच त्याने आणखीनही एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. आरोपीने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे, असं न्यायालयाने सांगितलं. मुलीला 18 जखमा होता. तिची पँट तिच्या तोंडांत 21 सेंटिमीटर आत कोंबण्यात आली होती. मुलीने या दरम्यान सहन केलेल्या वेदना तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी कसं सहन केलं असेल, याची कोर्टाला जाणीव आहे, असं म्हणत न्यायालय देखील हळहळलं. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी नसरापूर प्रकरणाचा निकाल जाहीर केला. (Pune Nasrapur Case Result Marathi News)
राज्यात जलदगतीने सुनावणी होऊन लागलेल्या निकालांपैकी हा एक निकाल ठरला आहे.निकालाचे वाचन करताना न्यायाधीश साळुंके म्हणाले, “शिक्षेच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, शिक्षा कमी करण्यास कारणीभूत परिस्थितींच्या मुद्द्यावर न्यायालयाने विचार केला. ॲड. अजय मिसर यांनी हे प्रकरण मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते असा युक्तिवाद केला. यासाठी त्यांनी विविध प्रकरणातील 12 न्याय संदर्भ दिले.”
न्यायालयाने या प्रकरणात ‘शंकर खाडे’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेतला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाऐवजी सलग जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने म्हटलं, “मृत्युदंडाची शिक्षा देताना कोणते निकष विचारात घ्यावेत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.”
“त्यामध्ये गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप असणे, गुन्ह्यामुळे न्यायालयाच्या विवेकबुद्धीला धक्का बसणे (judicial conscience), आरोपी समाजासाठी कायमचा धोका (menace) ठरू शकतो, पीडित पूर्णपणे असहाय (defenceless) असणे, गुन्हा कोणत्याही चिथावणीशिवाय (unprovoked) करण्यात आलेला असणे असे निकष आहेत. या प्रकरणात वरील सर्व निकष लागू होत असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला आहे.”

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













