Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ

दापोली : कळंबट येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

banner 468x60

दापोली तालुक्यातील कळंबट झिमणवाडी येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पिंकी मधु सवर वय ३५ यांनी दापोली पोलीस स्थानकात नोंदविली आहे.

banner 728x90

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या घरातून त्यांची अल्पवयीन मुलगी १७ जानेवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेली मात्र १८ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईला आपली मुलगी ही तिच्या जागेवर दिसली नाही परिसरात

आजूबाजूला नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध केल्यानंतरही ती न सापडल्यामुळे मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिला अज्ञाताने पळवून नेली असल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस ठाण्यात येथे केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निर्मळ करित आहेत.

Response (1)

  1. सर ही ती मुलगी झिमणवाडी मधील नसुन वीट भट्टी वर काम करणाऱ्या लोकांची आहे. गावातील लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *