Breaking News
चिपळूण : सावर्डेतील मंगल कार्यालयातून 1 लाख 87 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला, लग्नसोहळ्यात चोरट्यांचा डाव! चिपळूण : 38 वर्षीय तरुणाचा खोलीत मृतदेह आढळला, दोन दिवसांपासून होता घरातच रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात चिपळूण : रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था करा, शौकतभाई मुकादम यांची मागणी

मंडणगड : ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, चालक फरार

banner 468x60

आंबडवे ते मंडणगड मार्गावरील जांभळीची मळी परिसरात ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात संबंधित ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत रमेश गंगाराम गोरे (वय ३५, रा. घोसाळे धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २.५९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. आरोपी सुभाष लिंबाजी जाधव (रा. समर्थनगर, भिंगळोली) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. ४६/ए/१०८५) अतिवेगाने, निष्काळजी व बेदरकारपणे चालवत होता. रस्त्यावर कोणताही अडथळा नसतानाही परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने फिर्यादींचे चुलत भाऊ प्रकाश पांडुरंग गोरे (वय ३५, रा. घोसाळे धनगरवाडी) यांना जोराची धडक दिली.


या धडकेत प्रकाश गोरे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर मदत न करता आरोपी ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७४/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०६(२), १२५(अ), १२५(ड), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *