मंडणगड : दारूबंदी कायद्यान्वये तीन कारवाया, दोघे मद्यधुंद अवस्थेत आढळले, एकाकडून देशी दारू जप्त

banner 468x60

मंडणगड तालुक्यात अवैध दारूविक्री आणि मद्यप्राशनाविरोधात पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास या कारवाया करण्यात आल्या.

banner 728x90

पहिली कारवाई मंडणगड येथील छकुली देशी बारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश बबन काटेकर (वय ५८, रा. तिडे, ता. मंडणगड) हा दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी आढळून आला. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ९०/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही.

यानंतर याच परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास छकुली देशी बारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नवनित अनंत जाधव (वय ३८, रा. तांबडेवाडी, म्हाप्रळ, ता. मंडणगड) हा दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी गुन्हा क्र. ९१/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातही कोणताही मुद्देमाल मिळालेला नाही.

दरम्यान, मंडणगड पोलिसांनी अवैध देशी दारू बाळगल्याप्रकरणी आणखी एक कारवाई केली. दाभट तिटा येथील पुलाच्या मागील बाजूला असलेल्या आडोशात १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास कल्पेश रघुनाथ जाधव (वय ४५, रा. टाकेडे, ता. मंडणगड) हा बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने दारूचा साठा बाळगून असल्याचे पोलिसांना आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी जी.एम. संत्रा देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या १० प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ९२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिन्ही कारवायांमध्ये फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी अमित बाळासो भोसले (बक्कल क्र. ४२४), मंडणगड पोलीस ठाणे यांनी कार्यवाही केली आहे. तिन्ही गुन्हे १२ ऑगस्ट रोजी रात्री मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.

मंडणगड तालुक्यात अवैध दारूविक्री तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त आणि कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *