शृंगारतळीत : मध्यरात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणावर गुन्हा

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या दुकानाच्या गाळ्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तरुणाविरुद्ध गुहागर पोलिसांनी कारवाई केली. चोरीचा अपराध करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही घटना २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.४० वाजता शृंगारतळी येथे घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिन्द्र रमेश राजभर (वय ३१) हा शृंगारतळी पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या दुकानाच्या गाळ्याजवळ सूर्यास्तापासून सूर्योदयापूर्वीच्या कालावधीत अंधाराचा फायदा घेत स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पदरीत्या उभा होता. त्याचवेळी पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्याला थांबवून सदर ठिकाणी कोणत्या कारणासाठी उपस्थित असल्याची विचारणा केली. मात्र, त्याने याबाबत समाधानकारक उत्तर दिले नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

या प्रकरणी पोकॉ भावेश भगवान रोहीलकर (वय ३५, गुहागर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची नोंद २९ सप्टेंबर रोजी पहाटे २.५० वाजता करण्यात आली. पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *