Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरी : राज्यस्तरीय गायन स्पर्धेत स्वरा भागवतचे यश

banner 468x60

स्वराभिषेक-रत्नागिरी संगीत वर्गाची विद्यार्थिनी स्वरा भागवत हिने कोल्हापूर आणि संभाजीनगर येथील तीन राज्यस्तरीय गायन स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले.

यापैकी दोन स्पर्धा ऑफलाइन तर एक स्पर्धा ऑनलाइन स्वरूपाची होती. कोल्हापूर येथील रसिकाग्रहणी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय नाट्यगीत व भावगीत स्पर्धा कोल्हापूर येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल प्रांगणातील राम गणेश गडकरी सभागृहात पार पडली.

या स्पर्धेत पहिल्या गटात नाट्यगीत प्रकारात स्वराने प्रथम, तर भावगीत प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तिने सादर केलेल्या नाथ हा माझा या नाट्यपदाला उपस्थितांनी विशेष दाद दिली.

या दोन्ही स्पर्धांमध्ये रोख पारितोषिकासह, प्रमाणपत्र आणि सन्माचिन्ह देण्यात आले. याशिवाय संभाजीनगर येथील विवेकानंद शिक्षण संस्था आयोजित ऑनलाइन राज्यस्तरीय भक्तिगीत गायन स्पर्धेतही स्वराला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या स्पर्धांकरिता तिला तिच्या संगीत गुरू विनया परब आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलचे संगीतशिक्षक अभिषेक भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

तिचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण परब यांच्याकडे सुरू असून स्वराने विविध जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *