Breaking News
चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश

गुहागर : मोडका आगर येथील वीजखांब गंजलेलं

banner 468x60

तालुक्यातील मोडका आगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील ११ केव्ही लाईनचे दोन खांब पूर्णपणे गंजले आहेत. ते कधीही कोसळू शकतात.

यामुळे हे पोल बदलण्याची मागणी बागायतदार महेंद्र आरेकर गेले दहा वर्ष करत आहेत. मात्र, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मोडका आगर येथे १२ एकर जागेत आरेकर यांची नारळ, सुपारी व काजूची बाग आहे.

banner 728x90

या ठिकाणी देखभाल, खत, पाणी देणे यासाठी कामगार आहेत. याच बागेतून महावितरणची ११ के. व्ही. ची लाईन गेली आहे. या ठिकाणचे चार विद्युत खांब गंजले आहेत. यामधील दोन खांब पूर्णत: गंजले असून, ते केव्हाही कोसळतील, अशा स्थितीत आहेत.

हे खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी आरेकर यांनी महावितरणकडे केली.गंजलेले वीज खांब बदलण्यासाठी त्यांनी गुहागर, चिपळूण व रत्नागिरी या महावितरणच्या तिन्ही कार्यालयात लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *