Breaking News
मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना मंडणगड-म्हाप्रळ मार्गावर शेनाळेजवळ दरड कोसळली वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

संगमेश्वर : आंब्याच्या कलमावरून पडून जखमी झालेल्या प्रौढाचा रुग्णालयात मृत्यू

banner 468x60

भोवडे (ता.) येथील प्रौढ हापूस आंबा कलमवर चढून आंबे काढत असताना तोल जाऊन पडला. उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे दाखल केले होते.

banner 728x90

अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी १९ एप्रिल रोजी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.


लवेश शंकर शेलार ( ४२, रा. भोवडे, ता. संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. सोमवारी १५ एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा सुमारास तो रंजन शंकर सावंत यांच्याकडे आंबा काढणीसाठी मजुरीवर गेला होता.

त्याच्या घराजवळील आंबा कलमावर चढून आंबे काढत असताना तोल जाऊन पडला.त्याच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी साखरपा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते.

अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *