रत्नागिरी : इन्स्टाग्रामवर मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकले; एकावर गुन्हा दाखल

banner 468x60

इन्स्टाग्रामवर दोन लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार २३ जुलै २०२२ रोजी रत्नागिरी शहरातील एका भागात घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोहन वाभिटकर नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहन वाभिटकर याने स्वतःच्या मोबाइलवरून इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ३ ते ६ वर्ष वयोगटातील दोन लहान मुलांचा पॉर्न व्हिडीओ टाकला होता.

याची पोलिसांनी गंभीरतेने दखल घेतली असून, त्याच्यावर माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ ब प्रमाणे शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *