रत्नागिरी : लोटेश्वर मंदिराचा सोमवारी वर्धापन दिन

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील डुगवे येथील श्री लोटेश्वर मंदिराचा जेवणी उत्सव व वर्धापनदिन सोहळा २२ जानेवारीला होणार आहे.

banner 728x90

या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी ९ ते १० श्रींचा अभिषेक, १० ते ११.३० मिरवणूक, ११.३० ते १२.३० श्रींची महाआरती, दुपारी १ ते ६ महाप्रसाद,

सायंकाळी ६ ते ७ स्थानिक कार्यक्रम, ७ ते ९ स्तोत्र, १० वाजता बहुरंगी सलाम आदी कार्यक्रम होणार आहेत. ८ मार्चला महाशिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे.

या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *