Breaking News
संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना मंडणगड-म्हाप्रळ मार्गावर शेनाळेजवळ दरड कोसळली वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल खेडच्या पुरे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली; दोन वर्षांपासून नवीन इमारतीची प्रतीक्षा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

संगमेश्वर : Ayodhya Ram Mandir : कॉलेज विद्यार्थ्यानं साध्या पाषाणावर साकारलं अयोध्येचं राम मंदिर

banner 468x60

अयोध्या येथे होणाऱ्या राममंदिर (Ayodhya Ram Mandir) जीर्णोद्धार सोहळ्याचे औचित्य साधून सावर्डेतील कला महाविद्यालयातील शुभम दिलीप जाधव (Shubham Dilip Jadhav) या विद्यार्थ्याने रस्त्यावरील एका साध्या पाषाणावर अयोध्या मंदिराचे चित्र काढले आहे.

banner 728x90

हे चित्र १५ जानेवारीला सुरू झालेल्या वार्षिक कलाप्रदर्शनात प्रदर्शित केले आहे. शुभम हा कला महाविद्यालयातील मूलभूत अभ्यासक्रमातील प्रथम वर्षात शिकत आहे. या चित्राचे मूल्य त्याने पाच हजार रुपये ठेवले आहे.

ज्या कोणाला हे चित्र पाहावयाचे व विकत घ्यायचे असल्यास सावर्डे वहाळफाटा येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे हे प्रदर्शन होणार आहे. जास्तीत जास्त कलारसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *