Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी तीन तासांचा मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार

banner 468x60

गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर
देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पूर्वनियोजित मेगा ब्लॉक
घेतला जात आहे.

या कारणास्तव गुरूवार, दि. १८ रोजी ३
तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र, या मेगाब्लॉकचा
परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पूर्वनियोजित मेगा ब्लॉक घेतला जात आहे. येत्या गुरूवारी (१८ रोजी) मडगाव ते कुमटा या सेक्शन दरम्यान दुपारी बारा वाजून दहा मिनिटे ते तीन वाजेपर्यंत तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

त्यामुळे याचा परिणाम दोन विशेष गाड्यांच्या वेळांवर होणार आहे. मंगळूर सेंट्रल ते मडगाव (गाडी क्रमांक ०६६०२) ही १८ रोजी एप्रिल रोजी धावणारी गाडी मडगावपर्यंत न जाता कारवार पर्यंत नेण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासात कारवार येथूनच ही गाडी (क्रमांक ०६६०१) परत मंगळूरूपर्यंत चालवली जाणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील या मेगा ब्लाकमुळे कारवार ते मडगाव पर्यंतचा या गाडीचा प्रवास रद्द करण्यात आला असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली आहे.