कोकण रेल्वे मार्गावर अडीच तासांचा मेगाब्लॉक

banner 468x60

कोकण रेल्वे मार्गावर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत आडवली ते आचिर्णे विभागादरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच

तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.

कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रामुख्याने सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड- कणकवली विभागादरम्यान ९० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकादरम्यान १० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच इतर रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *