मोठी बातमी खेड : जगबुडीत पोहायला गेलेले पाच जण बुडाले

banner 468x60

खेडमध्ये हाती आलेल्या माहितीनुसार जगबुडी नदीत पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. तुंबाड येथे पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा यात बुडून मृत्यू झालाय.

यातील तिघांना वाचविण्यात यश आलं आहे. यामध्ये सौरभ हरिश्चंद्र नाचरे (वय – १९, पन्हाळजे), अंकेश संतोष भागणे (वय -२०, बहिरवली- मधली वाडी) अशी दोघा मृतांची नावं असून आज साधारण दूपारनंतर सौरभ, अंकेश, यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड इथल्या जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते.

पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमीत्ताने नदीमध्ये उड्या मारल्या. भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान मासेमारी करणाऱ्या नावाड्याने तीघांना वाचवले. मात्र सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. असून तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *