Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

शृंगारतळी : शिकारीसाठी गेलेल्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

banner 468x60

शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणार्‍या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

शृंगारतळी येथे चेक पोस्ट वर गुहागर पोलीसांनीनाकाबंदी केली असताना अभिजित विजय शेटे ( 41 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32 रा. कांदिवली) जोगेशशंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32 रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन (एमएच 06-टी 7860 या वाहनामधून एक 12 बोरबंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरीसह ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस नाईक राजेश शांताराम धनावडे यांनी फिर्याद दिली गुहागर पोलीस ठाणे येथे संशयितांविरोधात भारतीय शस्त्रअधिनियम कलम 3, 7, 25 भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे135 भारतीय कलम 188 IPC कलम प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आलेला आहे. 

या प्रकरणी संशयितांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपासगुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत. 

सध्या सर्वत्र शिकारचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले असून गुहागर पोलीस यांचीही धडक कारवाईमुळे शिकारी करणार्‍यांचे धाबे चांगले दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *