Breaking News
चिपळूण : फणस काढताना झाडावरून पडल्याने व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा

गुहागर : वरचापाट बाग मार्गावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

banner 468x60

गुहागर वरचापाट बाग मार्गावर एसटी आणि दुचाकीमधील अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सायंकाळी (दि. २) घडली. यामध्ये दोघेजण जखमी आहेत.

banner 728x90

यामध्ये शुभम सुभाष कदम (वय 20 रा. रानवी) या अपघातामध्ये मृत्यू झाला. आज सायंकाळी (दि. २ मार्च) शुभम सुभाष कदम, साहिल नरेश पवार (वय 20 रा. रानवी) आणि प्रणव प्रमोद मोहिते (वय १९ रा. त्रिशूल) हे तिघेजण दुचाकीवरून रानवीकडून गुहागरकडे निघालेले होते.

गुहागर वेलदूर या मार्गावरून जाणाऱ्या एसटीने जांभळादेवी येथे दुचाकीस्वारांना धडक दिली. यामध्ये शुभम , प्रणव आणि साहिल हे दुचाकीस्वारील तिघेजण गंभीर जखमी झाले.  तिघांनाही गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

मात्र यामध्ये शुभम कदम याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आला. तर साहिल पवार, प्रणव मोहिते यांच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *