Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

चिपळूण : अपघातातील दुचाकीचालकाचा मृत्यू

banner 468x60

तालुक्यातील सावर्डे ते गणेशखिंड असा प्रवास करत असताना दहिवली बुद्रुक येथील पुलावर दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा झालेल्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नितीन पांडुरंग वैद्य (५५) असे त्यांचे नाव आहे. या अपघातप्रकरणी त्यांच्यावर सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन वैद्य हे १४ डिसेंबर २०२३ रोजी दुचाकी घेऊन सावर्डे ते गणेशखिंड असा रात्रीचा प्रवास करत होते. दहिवली बुद्रुक येथील पुलानजीक ते आले असता त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकी घसरून अपघात झाला.

या अपघातात नितीन वैद्य यांना गंभीर दुखापत झाली. डेरवण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. रविवारी (२८ जानेवारी) पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *