आगामी लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला असून, गुहागर तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. सणाचा उत्साह आणि त्यातच शनिवारचा आठवडे बाजार एकत्र आल्याने शृंगारतळीतील मुख्य रस्ते आणि दुकाने ग्राहकांनी फुलून गेली आहेत.

मुंबई,ठाणे,पुणे आणि इतर शहरांमधून चाकरमानी आपापल्या मूळ गावी दाखल होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी गाड्या, खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांची शृंगारतळी परिसरात वर्दळ वाढली आहे. वाहनांच्या या गर्दीमुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शृंगारतळी बाजारपेठेत पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच होमगार्डचे जवानही ठिकठिकाणी तैनात असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यावर व कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर दिला जात आहे.
बाजारपेठेत मखर, रोषणाई, पूजा साहित्य आणि सजावटीच्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची गर्दी झाली आहे. तसेच आठवडे बाजार असल्याने भाजीपाला आणि किराणा सामानाची खरेदीही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर वाढलेल्या या वर्दळीमुळे आणि चाकरमान्यांच्या आगमनाने संपूर्ण गुहागर तालुक्यात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













