गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी भारतीय जनता पार्टी, मुंबई यांच्या माध्यमातून मोफत एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचे दापोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईसह विविध शहरांतून कोकणात आपल्या गावी येत असतात. या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुकर व्हावा तसेच सणाच्या काळात त्यांना प्रवासात दिलासा मिळावा, या उद्देशाने भाजपाच्या माध्यमातून मोफत एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दापोली येथे गणेशभक्तांच्या स्वागतासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, तालुका सरचिटणीस अजय कदम, तालुका अध्यक्षा तथा नगरसेविका जया साळवी, शहराध्यक्ष अतुल गोंदकर, सोशल मीडिया संयोजक ओंकार जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाल्याची भावना गणेशभक्तांनी व्यक्त केली. स्वागतासाठी दापोली भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













