Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

संगमेश्वर : कोळंबे येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

banner 468x60

संगमेश्वर कोळंबे येथील स्टॉपवर रस्त्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या स्वाराला डंपर चालकाने चिरडल्याची घटना नुकतीच घडली आहे.

या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक डंपर घेवून फरार झाला आहे. ही घटना १ वाजण्याच्या सुमारास घडली. मुजीब जाफर सोलकर (५०, कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला संगमेश्वर) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

मुजीब सोलकर हे कोळंबे येथे रस्त्याच्याबाहेर दुचाकी उभी करून बोलत होते. याच दरम्यान संगमेश्वरच्या दिशेने जाताना डंपर चालकाने सोलकर यांना रस्त्याबाहेर जावून उडवले.

एवढंच नव्हे तर अपघातानंतर त्याने डंपर सुसाट वेगाने संगमेश्वरच्या दिशेने पळवला, कोळंबे ग्रामस्थांना याची माहिती मिळताच ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी डंपर चालकाचा पाठलाग केला मात्र तो दिसून आला नाही. नंबर प्लेट नसल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण होते.

अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा येथील मुस्लीम मोहल्ल्यातील बांधव मोठ्या संख्येने जमा झाला आहे. या अपघाताची खबर संगमेश्वर पोलीसांना मिळताच संगमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहीतीनुसर ग्रामस्थांनी डंपर पकडला आहे. मात्र चालक फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *