Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

देवरुख : सप्तलिंगी नदीपात्रात कोसळून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

देवरुख शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. कृष्णा शंकर गोसावी (वय 45 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, कृष्णा गोसावी यांनी मद्यप्राशन केले होते. ते देवरुख येथील सप्तलिंगी नदीवरील पुलावरून ये-जा करत असताना अचानक तोल गेल्याने थेट नदीपात्रात कोसळले.

ही घटना रात्री 7 च्या सुमारास घडली. हा प्रकार मार्गावरून जाणार्‍या वाहनचालकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ मदतीस धाव घेत गोसावी यांना नदीपात्रातून बाहेर काढले व उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती कृष्णा गोसावी यांना मृत घोषित केले. यानंतर रात्री उशिरा कृष्णा यांच्या मृतदेहाचे शवविछेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. गोसावी हा भंगार गोळा करण्याचे काम करत असे. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदशनाखाली होत आहे. गोसावी यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *