दापोली : महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील जामगे येथील ७७ वर्षीय महिलेचा चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयश्री बाळकृष्ण पार्टे असे मृत महिलेचे नाव आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जयश्री पार्टे या राहत्या घरी खुर्चीवरून पडल्या. या दुर्घटनेत त्यांच्या डाव्या पायाच्या खुब्याला दुखापत झाली. त्यानंतर पालगड येथील डॉ. अशोक करंदीकर यांच्याकडे त्यांचा एक्स-रे काढून प्राथमिक उपचार करण्यात आले.

अधिक उपचारांसाठी त्यांना ९ ऑगस्ट रोजी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या डाव्या पायाच्या खुब्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांना दोन झटके आले आणि प्रकृती गंभीर झाली.

त्यानंतर त्यांना रुग्णालयातील आयसीयू विभागात व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. मात्र, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०८ वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर दापोली पोलिसांकडेही अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *