Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत ए.जी. हायस्कूलचे यश

banner 468x60

दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलने नुकत्याच झालेल्या 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उज्वल यश संपादन केले आहे. सदरचे प्रदर्शन रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभाग व दापोली तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली शहरातील सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल दापोली येथे संपन्न झाले.


या स्पर्धेत ए.जी. हायस्कूल मधील दिव्यांग प्राथमिक गट प्रथम क्रमांक दुर्वांक राजेश ढगे, स्मित दिपेंद्र जांभरकर, दिव्यांग माध्यमिक गट प्रथम क्रमांक वेदांत प्रवीण पाटील, नचिकेत अनिल वाडकर यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन साठी निवड झाली आहे.

तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत सार्थक शिवाजी पाटील, आर्यन बाळासाहेब नकाते यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहे. प्रयोगशाळा सहाय्यक गट द्वितीय क्रमांक पंकज रेमजे यांनी प्राप्त केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक संदीप दाभोळे व जीवन कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी,विद्यालयाचे

शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेठकर, मगदूम एस.आय., ज्येष्ठ शिक्षिका मानसी तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *