दापोली शहरातील एसटी डेपोबाहेरील गल्लीमध्ये टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या बेकायदा मटका जुगारावर दापोली पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडघर-दत्तवाडी येथील प्रशांत मुरलीधर मयेकर (वय ४८) हा लोकांकडून पैसे स्वीकारून विनापरवाना मटका जुगाराचा खेळ चालविताना आढळून आला. त्याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एकूण १,२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये १,२०० रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य समाविष्ट आहे. या प्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













