Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : माजी आमदार संजय कदम यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

दापोली : माजी आमदार संजय कदम यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

banner 468x60

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात उलट्या दिशेने वारे वाहत आहे. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट ) आणि काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

यातच भाजपचा बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या कोकणच्या राजकारणात रंगली आहे. दरम्यान माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सध्या बाळ माने हे शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रत्नागिरीत सुरू आहे. माने दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी माने यांनी साडू आणि आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबर ‘मातोश्री’वर गेले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची भेट घेतल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

तर आता माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरेंची भेट का घेतली आहे या भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र विधानसभेच्या निवडणुकीआधी गाठीभेटी वाढल्याने दापोलीच्या राजकारणात चर्चा सुरु झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *