पंचायत समिती शिक्षण विभाग आणि दापोली तालुका विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ए. जी. हायस्कूल येथे २० ऑगस्ट २०२६ रोजी तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात पार पडला. या मेळाव्याअंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोलीची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी शताक्षी सखाराम देसाई हिने प्रथम क्रमांक पटकावला.
शताक्षीने यापूर्वी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही रत्नागिरी जिल्ह्यातून शिष्यवृत्तीधारक म्हणून उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिच्या या कामगिरीमुळे ज्ञानदीप विद्यामंदिरच्या गुणवत्तेची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सरोज मेहता, सेक्रेटरी सुजय मेहता, हसमुख जैन, विश्वास कदम, रवींद्र कालेकर, सुयोग मेहता, संकेत मेहता, सुहासिनी कोपरकर, मुख्याध्यापक मधुकर मोरे, शिक्षक प्रतिनिधी स्नेहल पाटणे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी विजय पवार, अनन्या दुबळे, श्रेया मळेकर यांच्यासह सर्व समिती पदाधिकाऱ्यांनी शताक्षीचे अभिनंदन केले.
संस्थेच्या वतीने शताक्षीला भेटवस्तू देऊन तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













