Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेत 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील टाळसरे-तीलेवाडी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय संगीता कुमारी तुलेश्वर कुमार मेहता या तरुणीने राहत्या खोलीतील पंख्याला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

२३ जून रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गंभीर अवस्थेत असलेल्या संगीतालाच तातडीने खाजगी अॅम्ब्युलन्सद्वारे दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद (आमृ. क्रमांक ४५/२०२५) दापोली पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ (BNSS) च्या कलम १९४ अंतर्गत करण्यात आली आहे.

संगीता कुमारी ही मूळची बिहारची असून, काही काळापासून ती टाळसरे परिसरात वास्तव्यास होती. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *