Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : बीएसएनएल कार्यालयात चोरी

banner 468x60

दापोली शहरातील बीएसएनएल कार्यालयात घुसून जवळपास 9,950 रुपयांचा साहित्य ऐवज चोरीला गेल्याची घटना 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ते 13 नोव्हेंबरच्या सकाळी दरम्यान घडली.

या प्रकरणी गोपी रतन जाधव (23, रा. खेर्डी, खालची पेठ, चिपळूण) याच्याविरुद्ध दापोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.दूरसंचार अभियंता विजय राम मीना (35) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बीएसएनएल कार्यालयातील सी-डॉट एक्सचेंज कक्षाच्या भिंतीवरील एक्झॉस्ट फॅनच्या जागेतील होलचा वापर करून आरोपी जाधवने आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने कक्षात घुसलेल्या आरोपीने तेथील विविध साहित्यावर हात साफ केला.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 3,400 रुपये किंमतीची कॉपर एसी कुलंट पाईप, पिवळ्या व लाल रंगाच्या तांब्याच्या पाईपा, 500 रुपये किंमतीचा एसी फिल्टर एलिमिनेटर, 2,050 रुपये किंमतीचे अर्थिंग केबल, काळ्या–लाल–पिवळ्या रंगाच्या 2.5 मीटर केबली, तसेच 4,000 रुपये किंमतीचा रेक्टिफायर असा एकूण 9,950 रुपयांचा माल समाविष्ट आहे. दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *